आणि Petrol - Diesel बाबतची ही बातमी उडवेल तुमची झोप | Lokmat Marathi News Update | Lokmat News

2021-09-13 2

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये सलग वाढ होत आहे. २०१४ मध्ये डिझेलच्या किंमती सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्यात आल्या. त्यावेळी आंतर राष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत घट होत होती.त्यावेळी सरकारने पेट्रोल-डिझेलवर उत्पाद शुल्क वाढवलं होतं जेणेकरुन आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती वाढल्या तर शुल्कात पुन्हा कपात करता येईल. दिल्लीमध्ये सोमवारी डिझेल ६०.४९ रुपये प्रति लिटरवर पोहोचले तर, पेट्रोलचे दर ७०.४३ रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. त्या काळात पेट्रोल च्या दरात आणखीन वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पाद शुल्कात दोन-दोन रुपये प्रति लीटरने कपात केली होती. मात्र, तरीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ सुरुच आहे. आंतर राष्ट्रीय बाजारात सध्या ब्रेंट क्रूडची किंमत ६७ डॉलर प्रति बॅरलच्यावर पोहोचली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires